Showing posts with label Vijayadashami Special Pravachan. Show all posts
Showing posts with label Vijayadashami Special Pravachan. Show all posts

Friday, 10 October 2014

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.१०.२०१२) - विजयादशमी विशेष

॥ हरि ॐ ॥

आज विजयादशमी सगळ्यांना असे वाटते की आजच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करायचे एवढ्यापुरतेच दस‍र्‍याचे महत्त्व असते. 

दसर्‍याचे खरे महत्त्व आहे ते सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्या सीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणे चुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमा विस्तारणे. आपल्या क्षमता, capacity, potency वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. सकाळी सरस्वतीदेवतेची व संध्याकाळी शस्त्रांची पूजा केली जाते. म्हणजेच ज्ञान व विज्ञानाची ह्या दिवशी पूजा होते. हे कशासाठी? तर स्वत:चे कौशल्य, compatibility वाढवण्यासाठी.

आज आपण इतकी वर्षे इथे जमतोय त्यामुळे आम्ही पूजा कशी करायची हा प्रश्न आम्हांला पडता कामा नये. मी मागे सांगितले होते, "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा." कधी आठवतेय? नाही ते पण आठवत नाही. ह्या वर्षाच्या सुरुवातीला आता वर्ष संपायला दोनच महिने उरले आहेत. मग ह्या वाक्याच्या आम्ही किती जवळ गेलो हे तुम्ही स्वत:च ठरवा.