Friday 10 October 2014

विजयादशमी पूजन

विजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सद्‌गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे.
पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात.
आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा ह्यांचे एकत्रिकरण म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा. मानवाच्या हातून घडलेल्या निर्मितीची पूजा.
Shree-Saraswatiसंपूर्ण सृष्टीतले ज्ञान आम्ही नाही पेलू शकत, ते अफाट आहे. ज्ञान म्हणजे फक्त डिग्री नव्हे. त्यामुळे आपल्या जीवनासाठी आवश्यक तेवढे ज्ञान आपल्याला ग्रहण करता यावे ह्यासाठी हे पूजन आहे. 
ही चिन्हं दगडी पाटीवरच का काढावीत? कारण पहिले लिहिले गेलेले / कोरले गेलेले वा‌‌ङ‌‌‍मय दगडावर‌ कोरले गेले होते व जी गायत्रीमातेची पहिली प्रतिमा श्रीपरशुरामाने काढली ती त्याने पाषाणावर काढली होती. म्हणून दगडी पाटीवरच ह्या प्रतिमा काढाणे श्रेष्ठ व श्रेयस्कर. 
श्रीसरस्वतीची प्रतिमा प्रथम प्रशुरामाने काढली व धारिणीने रेखाटली. श्रीसरस्वतीला आपण शिक्षणाची देवता मानतो. सरस्वतीच्या प्रतिमेत शिवत्रिकोण व शक्तीत्रिकोण (उलटा त्रिकोण) आहेत. शिवाय सरस्वती चिन्हात १ चे ७ आकडे असतात. हे ७ वेळा १ म्हणजे सप्तस्वर आहेत, मराठीतील “सा, रे, ग, म, प, ध, नी, सा” व इंग्लिशमधील “डो, रे, मी, पा, सो, ला, मी”. अनसूया मातेचा जन्म ही सप्तस्वरातूनच झाला. सप्तस्वर म्हणजे अनसूयेच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक वेळेला उमटलेला ध्वनी आहे. १ चे ७ आकडे म्हणजे आदिमाते़च्या आमच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे पूजन आहे. ह्या सप्तस्वरांनी बनलेले संगीतचे महत्त्व इतके आहे की ते मानवाला शांती देते. संगीत वनस्पतींना देखील उल्हासित करते. गोशाळेत चांगले संगीत लावले तर त्याचे गाईंच्या गर्भावरसुध्दा चांगलेच परिणाम होतात. 

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.१०.२०१२) - विजयादशमी विशेष

॥ हरि ॐ ॥

आज विजयादशमी सगळ्यांना असे वाटते की आजच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करायचे एवढ्यापुरतेच दस‍र्‍याचे महत्त्व असते. 

दसर्‍याचे खरे महत्त्व आहे ते सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्या सीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणे चुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमा विस्तारणे. आपल्या क्षमता, capacity, potency वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. सकाळी सरस्वतीदेवतेची व संध्याकाळी शस्त्रांची पूजा केली जाते. म्हणजेच ज्ञान व विज्ञानाची ह्या दिवशी पूजा होते. हे कशासाठी? तर स्वत:चे कौशल्य, compatibility वाढवण्यासाठी.

आज आपण इतकी वर्षे इथे जमतोय त्यामुळे आम्ही पूजा कशी करायची हा प्रश्न आम्हांला पडता कामा नये. मी मागे सांगितले होते, "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा." कधी आठवतेय? नाही ते पण आठवत नाही. ह्या वर्षाच्या सुरुवातीला आता वर्ष संपायला दोनच महिने उरले आहेत. मग ह्या वाक्याच्या आम्ही किती जवळ गेलो हे तुम्ही स्वत:च ठरवा.